प्रगती फाऊडेशन संचालित लिटील्स वर्ल्ड शाळेचा सातवा वार्षिक स्नेह सम्मेलन थाटात साजरा

नवी मुंबई महापौर जयवंत सुतार यांची खास ऊपस्थिती

प्रगती फाऊडेशन संचालित लिटील्स वर्ल्ड शाळेचा सातवा वार्षिक स्नेह सम्मेलन थाटामाटात साजरा करण्यात आला. नवी मुम्बईचे महापौर जयवंत सुतार यानी कार्यक्रमास खास उपस्थिति राहून बाल गोपालाना आशिर्वाद दिले आणि उपस्थित पालक वर्गाला मार्गदर्शन केले. शनिवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शिरवणे गणेश मंदिर येथील सभाग्रुह मध्ये पालक, विध्यार्थी, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक नगसेवीका तनुजा मढवी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

विविध मनोरंजनाचे तसेच करमणुकीचे कर्यक्रम बाल गोपालांनी सादर करुन ऊपस्थित रसिकांचे मनोरंजन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री कीरण राणे यांनी मान्यवरांचे आभार मानून ऊपस्थित पालकवर्ग आणि बालगोपालांना शुभेछा दिल्या. लिटील्स वर्ल्ड शाळेच्या प्राचार्या सिद्धि राणे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. सदर कार्यक्रमात प्रगती फाऊंडेशन मार्फत महिला सक्षमीकरण उड्डाण या प्रोजेक्ट अंतर्गत सौ.प्रियांका नावानी व सौ. प्रिति दुग्गलय या दोन महिलांचा “यशस्वी महिला उध्योजिका 2019” म्हणुन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेमार्फत वर्षभरात सामाजिक  क्षेत्रात स्वयंसेवक म्हणून विशेष कामगिरि करण्यात आलेल्या चिन्मय चव्हाण यांना “स्वयंसेवक 2019” या सन्मानाने गौरविण्यात आले.