
गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईतचे रुग्णही वाढू लागले आहेत. याची दखल घेत मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी नवे नियम जाहीर केले. त्यात भर घालत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार इथून पुढे मुंबईत घरातलं विलगीकरण किंवा होम क्वारंटाइन बंद करण्यात आलं आहे.
यापुढे लक्षण विरहित लोकांनासुद्धा होम क्वारंटाइन करणार नाही. प्रत्येकाला कोविड सेंटरमध्ये जावंच लागेल, असं महापौरांनी स्पष्ट केलं.
सर्व सार्वजनिक कार्यक्रम आजपासून बंद करत असल्याचही महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलं. लग्न समारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणसं दिसली तर कारवाई होईल. कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे किंवा मास्क वापरण्याचे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई होईल, असे मुंबईच्या आयुक्तांनी जाहीर केलं आहे.






