
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ऐकायला मिळते न मिळते तोच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या कन्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) हे देखील कोरोना बाधित (COVID-19 Positive) झाल्याचे समोर आले. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.











