रेल्वे प्रवासात कोल्ड्रींक मधून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या भामट्यास अटक

कल्याण – रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकून लुटणाऱ्या भामटय़ास कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे

चालत्या रेल्वेमध्ये अनोळखी व्यक्तीकडून काही खायला किंवा प्यायला घेऊ नका असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे

गोविंदराम चौधरी असे या भामटय़ाचे नाव असून गोविंदराम चौधरी हा राजस्थानचा राहणारा आहे.