भेडिया चित्रपटाचा ट्रेलर – टीजर रिलिज

अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू बिग बजेट हिंदी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. अनेक बहुप्रतिक्षित असे बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील समोर आले आहे.

त्यात आता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) स्टारर एक कॉमेडी आणि हॉरर ने भरलेला ‘भेड़िया’ (Bhediya Teaser) चित्रपटाचा टीजर समोर आला आहे. ज्याच्या माध्यमातून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. 14 एप्रिल 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा टीजर पाहून अंगाचा थरकाप उडाल्याखेरीज राहणार नाही. स्त्री आणि बाला या चित्रपटांचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी हा चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल देखील या प्रोजेक्टचा भाग असतील.