
वाशिम जिह्यातील पोहरादेवी येथील गर्दीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांकर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्क प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले. कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे. हे सर्कानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.











