
मुंबईतील कार्मिकल रोड येथील संशयास्पद कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळल्या असून बॉम्ब शोधक-विनाशक पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सदर गाडी स्फोटकांनी भरून ठेवण्यात आली होती. मुकेश अंबानी यांच्या घराच्या येथे आढळली संशयित हिरव्या रंगाची कार पार्क करण्यात आली होती. बॉम्ब शोधक-नाशक पथाकडून पाहाणी करण्यात आली असून या गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी दिसत असून, गाडीत स्फोटके तसेच धमकीचे पत्र सापडले असल्याचं बोललं जात आहे.











