मिथुन चक्रवर्ती यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

तत्पूर्वी आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. कैलास विजयवर्गीय हे मिथुन चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. तेव्हा मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.