
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत नेरूळशिवसेना शाखाक्रमांक ९२/९९ च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
शिवसेना शाखा क्र.९२/९९ वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, आरोग्य आणि उद्योजक क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या विविध महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष पाटील, उप शाखा प्रमुख कुणाल निरभवणे यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमास संतोष मोरे उपशहरप्रमुख वैशाली पाटिल शाखासघटक निनाद कदम शाखा प्रमुख रंगनाथ इंदौरे उपशाखा प्रमुख शशिकांत कांबली आनंद नायर आदी मान्यवर उपस्तिथ होते.











