अंबरनाथमध्ये बिस्कीट कंपनीला भीषण आग

अंबरनाथ पूर्वेकडील आनंद नगर एमआयडीसी येथे एका कंपनीला भीषण आग लागली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आनंद नगर एमआयडीसी येथे मे. आर. के. बिस्कीट कंपनी आहे. या कंपनीला भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी अंबरनाथ व बदलापूर अग्निशमन केंद्राचे एकूण 8 फायरवाहन उपस्थित असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत नाही.