देवेंद्र फडणवीस: ‘उद्धव ठाकरे सरकार राज्यातील सर्वांत लबाड सरकार’

महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे सरकार एक लबाड सरकार म्हणून ओळखले जाईल,” अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही अशी घोषणा सरकारने सभागृहात केली होती. पण आता सरकारने घूमजाव केला आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारने केलं,” असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं.

ते म्हणाले, “सरकारची केवळ नौटंकी सुरू असून केवळ घोषणा करायच्या आणि माघार घ्यायची. यामुळे जनेतेचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.”