महाराष्ट्रातील लॉकडाऊनवर २ दिवसांत निर्णय होणार

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना राज्यातील कोरोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सध्या दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं.

”मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी काल बोलणं झाले आहे. त्यांनी वाढती रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. जर करोना रुग्ण वाढत असतील, तर काही शहरात लॉकडाउन लावावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणण आहे. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल. पण जनतेला एकच आवाहन करतो की, लॉकडाउन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत.” असं आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी जनतेला केलं आहे.

”दररोज राज्यात ३ लाख लोकांचं लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणं वाढवतो आहे व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करतो आहे. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे इथून पुढे आणखी जे जे लोकं लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे.”