
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे.या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले आहे.सध्या पवारांची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.३१ मार्चला त्यांची एन्डोस्कोपी झाल्यानंतर पवार यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.त्यामुळे या दरम्यान पवारांचे सर्व कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहेत.











