
पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दिवसेंदिवस वाढ होतेय तसेच वातावरणात प्रदूषण होण्याचीही समस्या आहे. यासगळ्यावर उपाय म्हणजे वाहनं जर का पाण्यावर चालली तर? हो खरंच हे शक्य आहे. पण, तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला आहे. या प्रयोगामुळे दुचाकी पेट्रोलऐवजी चक्क पाण्यावर चालू शकते. केवळ ८ हजार रुपये खर्च करून त्यांनी हा प्रकल्प साकारला आहे.
शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना एक प्रकल्प सादर करायचा असतो. हिमांशू पेडणेकर, सिद्धार्थ जोशी, सतिश आंबेटकर, या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक रवि येरिगेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यावर चालणाऱ्या या दुचाकीचा प्रकल्प केला आहे. या प्रयोगामुळे बाइकचं इंजिन पाण्यावर चालू शकेल. पाण्याच्या चार छोट्या बाटल्या त्यांनी दुचाकीला बांधल्या होत्या. पाण्यावर चालवण्यापूर्वी दुचाकीची पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी करणं आवश्यक आहे, असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं.
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना एक प्रकल्प सादर करायचा असतो. हिमांशू पेडणेकर, सिद्धार्थ जोशी, सतिश आंबेटकर, या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक रवि येरिगेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यावर चालणाऱ्या या दुचाकीचा प्रकल्प केला आहे. या प्रयोगामुळे बाइकचं इंजिन पाण्यावर चालू शकेल. पाण्याच्या चार छोट्या बाटल्या त्यांनी दुचाकीला बांधल्या होत्या. पाण्यावर चालवण्यापूर्वी दुचाकीची पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी करणं आवश्यक आहे, असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं.
बाइक पाण्यावर चालवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेचा उपयोग केला आहे. इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेत एक बॅटरी, मीठ घातलेलं पाणी, धातूचे रॉड यांचा उपयोग करून हायड्रोजन गॅस तयार केला जातो. हा गॅस रिकाम्या बाटलीमध्ये जमा करून नंतर तो दुचाकीच्या कॉर्बोरेटरमध्ये सोडला जातो. त्यानंतर दुचाकीला किक मारून इंजिन सुरू होतं.











