
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या सलामी जोडीने दिल्ली कॅपिटल्सला शानदार सुरुवात करून दिली आहे. यादरम्यान, पृथ्वीने आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत आयपीएलमधील सातवे शतक पूर्ण केले. पृथ्वीने आपल्या अर्धशतकी खेळीत 27 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 2 षटकार खेचले.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 7 विकेट्सने चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) मात करत 14व्या हंगामाची झोक्यात सुरुवात केली आहे. सुपर किंग्सने दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने ओपनर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) धमाकेदार 85 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई गोलंदाजांची धुलाई करत 3 विकेट गमावून विजय मिळवला.
दिल्लीकडून पृथ्वी शॉने 72 तर कर्णधार रिषभ पंतने नाबाद 15 धावांचे योगदान दिले. मार्कस स्टोइनिसने 14 धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नई गोलंदाज आजच्या सामन्यात दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांपुढे निरुत्तर दिसले. चेन्नईकडून शार्दूल ठाकूर 2 तर ड्वेन ब्रावोला 1 विकेट मिळाली. अशाप्रकारे दिल्लीने यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयाने केली तर चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात चेन्नईकडून मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. मोईन अलीने 36 तर सॅम कुरनने 34 धावांचे योगदान आले. दिल्लीकडून आवेश खान आणि क्रिस वोक्स यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.











