
प्रतिनिधी / मुंबई
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉक डाउन लागण्याची शक्यता असून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स तसेच विविध घटकांशी उद्या चर्चा करून घेणार आहेत. हे लॉक डाउन आठ की पंधरा दिवसांचे असेल यावरही उद्या निर्णय होईल.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून हे संक्रमण रोखणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या सर्वपक्षीय बेथकित किमान १५ दिवसांचा लॉक डाउन लावला तरच ही स्थिती आटोक्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले .
सर्वाना थोडी कळ सोसावी लागेल असेही ते म्हणाले. आता कडक निरब्ध लावून हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी लॉक डाउन लावावे लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या लॉक डाउन ला सहमती देतानाच हा निर्णय समाजातील विविध घटकांसाठी काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत कोणता रोड मॅप आहे अशी विचारणा केली. जनतेला विश्वासात घेऊनच हा निर्णय घ्यावा अन्यथा उद्रेक होईल असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत लवकरच माहिती देण्यात येईल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले. आम्ही या संकट काळात राजकारण थांबवतो पण तुम्हीही जनतेला विश्वासात घ्यावे असे फडणवीस यांनी ठाकरे यांना यावेळी सांगितलयाचे समजते.
महाविकास आघाडी सरकार मधील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांनी लॉक डाउन करुन रुग्ण वाढ कमी करण्यास आपला पाठींबा दर्शविला. पण त्यासाठी सर्वाना किमान दोन ते तीन दिवसांचा अवधी देण्यात यावा अशो अपेक्षा मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी ने सुद्धा आता लॉक डाउन आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयाला पाठींबा दिला.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारचा कल लॉक डाउन चा दिसत असून सद्यस्थिती मध्ये आम्ही या निर्णयासाठी सरकारला समर्थन दिले तरी जनेतच्या समस्येबाबत काय उपाय योजना सरकार करणार आहे हे जाहीर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.











