
लॉक डाऊन १५ मे पर्यंत वाढणार असल्याचे दिले संकेत
कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी देशभरासह महाराष्ट्रातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी येत्या 1 मे 2021 पासून कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र 1 मे पासून या वयोगटासाठी लसीकरण करण्यात येणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आज (28 एप्रिल 2021) ही माहिती दिली. या वयोगटासाठी लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला असला तरी आवश्यक त्या प्रमाणात लस ( COVID 19 Vaccine) पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीकरण करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे जाहीर केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले असले तरी, हे लसीकरण करता येणार नसल्याचे टोपे या वेळी म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्राला 18 ते 45 वर्षे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसींचे 12 कोटी डोस आवश्यक आहेत. त्यासाठी राज्य सरकार 6, 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
दरम्यान, 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार असले तरी लगेचच त्याला गती येईल असे नाही. कारण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली पाहिजे. सध्यास्थितीत तेवढी लस उपलब्ध नाही. त्यामुळे 1 मे पासून 18 ते 45 या वयोगटासाठी सुरु होणारे लसीकरण होणार नसल्याचे टोपे म्हणाले.
राज्यातील लसीकरण कार्यक्रम केवळ सहा महिन्यांत संपवण्याचा निर्धार महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारची इतक्या कार्यक्षमतेने लसीकरण करण्याची क्षमता आहे, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
लॉकडाऊन च्यां बाबतीत ही १ मे नंतर आणखी पंधरा दिवस लॉक डाऊन वाढवणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.











