अजब कारभार: कोरोना चाचणी निगेटिव्ह असतानाही वाशीतील कोव्हिडं सेंटर मध्ये केले भरती

नवी मुंबई – प्रतिनिधी

देशात स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईतील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना मुळे जनता आधीच त्रस्त आहे त्यात न. मु. म. पा. आरोग्य विभागाने घोळ करून ठेवला आहे. नुकताच एक अशाच भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे.


बेलापूर मध्ये राहणारे 34 वर्षीय इसम ताताराव गरथम यांनी गावी आंध्रप्रदेश राज्यात जायचे होते त्यासाठी त्यांनी आपली कोरोना चाचणी केली त्यावेळी त्यांच्या RTPCR चा रिपोर्ट निगेटिव्ह आला , परंतु मनपाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती करत त्याची रवानगी वाशीतील सिडको कोव्हिडं सेंटर मध्ये भरती केले आहेे .

संबधीत व्यक्तीस कोणतीही Covid सदृश्य लक्षणं नाहीत, तसेच त्यांना कसलाही त्रास नाही. या व्यक्तीने RTPCR रिपोर्ट आंतरजिल्हा प्रवास करता यावा याकरीता रिपोर्ट काढला होता.

याबाबात बोलताना ताताराम गथराम यांनी सांगितले की, त्यांना कोणतेहीलक्षणंनाहीत त्रास नाही, रिपोर्ट निगेटिव्ह आहे मग आमच्या सारख्या गरिबांना का कोरोनाचा बळी बनवत आहे ? पालिकेचे अधिकारी चुकीचे काम करत आहे. याविषयी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी दमयंती घाडगे यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.