
मुंबईत पेट्रोलच्या दरानं अखेर शंभरी गाठली. शनिवारी मुंबईत पेट्रोल १०० रुपये १९ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे.
पेट्रोलच्या दरात लिटरमागे २६ पैसे, तर डिझेल दरात २८ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राज्यांमध्ये स्थानिक मूल्यवर्धित कर वेगळा असल्यानं इंधनाचे दर वेगवेगळे असतात.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ९३ रुपये ९४ पैसे झाले असून डिझेलचे दर ८४ रुपये ८९ पैसे झाले आहेत. गेल्या ४ मेपासूनची ही १५वी इंधन दरवाढ आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी दरवाढ १८ दिवस रोखण्यात आली होती. राजस्थानात श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०४.९४ पैसे लिटर असून डिझेल ९७ रुपये ७९ पैसे आहे. गेल्या महिन्याभरात १५ वेळा इंधनाची दरवाढ करण्यात आली आणि त्यात पेट्रोलचे दर ३ रुपये ५४ पैसे, तर डिझेलचे दर ४ रुपये १६ पैशांनी वाढवण्यात आले आहेत.

बहुतांश कर्मचारी खासगी दुचाकी, चारचाकी वाहनाने कामावर ये-जा करत आहेत. इंधन दरांत होणाऱ्या सततच्या वाढीमुळे त्यांचा हा प्रवास दिवसेंदिवस महाग होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी आठवड्याला २५० रुपयांचे पेट्रोल लागायचे, आता त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहेत. उत्पन्न तेवढेच खर्च मात्र वाढत चालला आहे अशी सर्वसामान्य माणसाची परीस्थिती झाली आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल १०० रुपये १९ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे.






