Rain Alert: मुंबईत मालवणी येथे दुमजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू आठ जण जखमी.

मुंबईत (Mumbai) मालाड (Malad ) परिसरातील मालवणी (Malvani) येथे असलेल्या दुमजली चाळीतील एक इमारत कोसळल्याचे (Building Collapsed at Malvani) वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे (Rains in Mumbai) ही इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत.

मदत आणि बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

इमारतीच्या मलब्याखाली काही निवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील मालवणी भागातील चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळली. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत. ढिगाऱ्यातून दोघांना बाहेर काढण्यात अले आहे. आणखीही काही लोक मातिच्या ढिगाऱ्याखाली असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोसळण्याच्या वेळी लहान मुलांसह अनेक लोक इमारतीच्या आत होते.

मुंबई शहरात आज मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. मान्सूच्या पावसाने पहिल्याच दिवशी मुसळधार सुरुवात केली. त्यामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणांवर पाणी साचले. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, मान्सून पावसापूर्वीच म्हाडाने मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अतिशय धोकादायक स्वरुपात असलेल्या 21 इमारतींचा समावेश आहे.जवळील तीन इमारती धोकादायक असून त्यातील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले.

दरम्यान, मुसळधा पावसाची संततधार पुढचे आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत म्हटले आहे की, पुढचे दोन ते तीन दिवस मुंबई आणि कोकण समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.