मुंबई बाहेरील खासगी लसीकरण केंद्राना शहारात लस देण्यास परवानगी नाही

खासगी लसीकरणासंदर्भत महापालिका आयुक्तांनी गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मुंबई बाहेरील लसीकरण केंद्रांना शहरात लस देता येणार नाही आहे. या लसीकरण केंद्रांनी औद्योगिक संस्था, गृहकुल येथे लसीकरण मोहिम राबवण्यापूर्वी संबंधित संस्थेसोबत सामंज्यस करार करणे असे गाइडलाइन्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

खासगी लसीकरण केंद्रांना त्यांच्याकडील रुग्णवाहिकेची संख्या, वैद्यकिय कर्मचारी यांची पुरेश्या प्रमाणात उपलब्धता असणे गरजेचे असणार आहे. त्याचसोबत या लसीकरण केंद्रांनी राजकीय पक्षाची जाहीरातबाजी सुद्धा करु नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गाइडलाइन्सच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास सदर लसीकरण केंद्राच्या विरोधात कारवाई केली जाईल. तसेच त्या केंद्राची मान्यता ही रद्द केली जाणार आहे.

लस उत्पादकांनी ठरविलेले दर आणि त्यावर लागू होणारे कर हे लक्षात घेऊन केंद्राने कोरोना लसीचे कमाल दर निश्चित केले आहेत. त्यानुसारच खासगी रुग्णालयांनी लसींचे दर आकारण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे