
इंग्लंडच्या (England) ब्रिस्टल काऊंटी मैदानावर (Bristol County Ground) खेळल्या गेलेल्या इंग्लडने आणि भारत महिला (India Women) संघातील एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर टीम इंडिया सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरली.
राणाने 80 धावांची निर्णायक नाबाद खेळी केली तर शेफालीने दुसऱ्या डावात 63 दहावीची विक्रमी कामगिरी बजावली. पदार्पणातील कसोटी सामन्यात चार विकेट्स घेवून फावत 50 पेक्षा जास्त धावा करणारी राणा ही भारताचा पहिली खेळाडू ठरली आहे. तसेच, ही कामगिरी करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे.
ब्रिस्टल मैदानात फॉलोऑन खेळणाऱ्या मिताली राजच्या भारतीय संघाने चौथ्या दिवसाखेर 344 धावांवर 8 विकेट गमावल्या व सामना ड्रॉ केला. विशेष म्हणजे यामुळे, ब्रिटिश संघाची मायदेशात भारताविरुद्ध कसोटी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली आहे.











