
रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगेवेगळे डेटा प्लॅन लॉन्च करत असते. कंपनी दरदिवशी 1 जीबी डेटा पासून ते 3 जीबी डेटापर्यंत प्लॅनची सुविधा देत आहे. काही असे प्लॅनदेखील आहेत ज्यात विना डेली लिमिट डेटा दिला जातो.
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना वेगवेगळे प्लॅन असलेले 4 जी डेटा व्हाउचर सुद्धा ऑफर करतो. ज्या वापरकर्त्यांचा डेटा संपला आहे किंवा त्यांची दैनंदिन मर्यादा पूर्णपणे वापरली आहे, अशा वापरकर्त्यांसाठी कंपनीचे हे व्हाउचर खूप उपयोगी ठरतात. जिओच्या सर्वात स्वस्त 4 जी डेटा व्हाउचरची किंमत 11 रुपये आहे. रिलायन्स जिओ ग्राहकांना 11 रुपयांमध्ये 1 जीबी डेटा ऑफर करत आहे. मात्र या ऑफरमध्ये ग्राहकांना डेटा व्यतिरिक्त इतर कोणतीही सुविधा मिळत नाही. याची वैधता आपल्या सक्रिय प्लॅनवर अवलंबून असते. म्हणजेच तुमचा ऍक्टिव्ह प्लॅन वर्षभराचा असेल, तर याची वैधताही वर्षभराची असणार आहे.
11 रुपयांव्यतिरिक्त कंपनी 21, 51 आणि 101 रुपये किंमतीचे तीन अन्य 4 जी व्हाउचर देखील ऑफर करत आहे. ग्राहकांना 21 रुपयात 2 जीबी डेटा आणि 51 रुपयात 6 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच 101 रुपयांच्या 4 जी व्हाउचरमध्ये आपल्याला 12 जीबी डेटा मिळेल. खास गोष्ट म्हणजे हे तीन व्हाउचर देखील आपल्या ऍक्टिव्ह प्लॅन इतकी चालणार आहेत.











