India Vs Sri Lanka ODI 2021: श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात करून 2-0 ने भारताच्या मालिका खिशात

कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दीपक चाहरच्या (Deepak Chahar) अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) यजमान श्रीलंकेवर (Sri Lanka) 3 विकेट्सने मात केली आणि तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली.

दीपकने निर्णायक क्षणी शानदार बॅटिंग करत विजयश्री खेचून आणला. दीपकने 82 चेंडूत 69 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. यापूर्वी त्याने 2 विकेट्स देखील काढल्या होत्या.

दीपकव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 53 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. मनीष पांडेने 37 तर कर्णधार शिखर धवनने 29 धावांचे योगदान दिले. कृणाल पांड्याने 35 धावांची खेळी केली. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) 19 धावा करून नाबाद राहिला.

दुसरीकडे, श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) 3 विकेट्स घेतल्या. कसुन राजीता, लक्षण संदाकन आणि दासुन शनाका यांना प्रत्येकी एक विकेट काढली.

सामना भारताच्या हातून निसटला असे दिसत असताना दीपकने आक्रमक बॅटिंग करून सामन्यासह मालिकाही भारताच्या खिशात घातली. यापूर्वी भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला होता.