
(नवी मुंबई प्रतिनिधी) २० जुलै २०२१.
नवी मुंबईमधील प्रगती फाउंडेशन ही सेवाभावी संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक वर्षापासून कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून गरजूंना अन्य धान्य वाटप, शैक्षणिक मदत, रक्तदान शिबिरांचे आयोजन, विविध वैद्यकीय चिकित्सा शिबिरांचे आयोजन, कोरोना काळात रुग्णांना मदत तसेच अल्पोपहार, संपुर्ण आहार असे विविध कार्यक्रम वारंवार होत असतात.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण राणे व व्यवस्थापिका सौ. सिद्धी राणे यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून संस्थेचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही पोचवले आहे. संस्थेच्या अनेक उपक्रमांची दखल घेत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद होऊन संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.

प्रगती फाऊंडेशनच्या वतीने १९ जुलै रोजी “संपूर्ण आहार उपक्रम ” या प्रकल्पांतर्गत मुंबई मधील केईएम हॉस्पिटल जवळ वंचितांना भोजन पॅकेटचे वितरण करण्यात आले.
स्वर्गीय श्री. अनिल पाटकर यांच्या जयंती निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामचंद्र अनिल पाटकर, स्नेहल केसरकर, निशिता सताजी आणि रवींद्र सताजी यांनी सेवा बजावली.

तसेच कोरोना काळात जेवण, नाष्टा, मास्क, धान्य किट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रगती फाउंडेशन तर्फे राबविण्यात आलेल्या लोकसेवा या कार्यक्रमांतर्गत मुलुंड विभागातील पोलिसांना एन- ९५ मास्कचे वाटप करण्यात आले.












