भारतीय पुरुष हॉकी टीम सेमी फायनलमध्ये दाखल

टोकियो ओलम्पिक 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी टीम उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. ग्रेट ब्रिटनला quarter-finals मध्ये 3-1 अशी मात देत पुरुष टीम पदकाच्या अजून एक पाऊल जवळ पोहचली आहे.

टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पुरुषांच्या भारतीय हॉकी टीमने (Hockey Team India mens) इतिहास घडवला आहे. जवळपास 49 वर्षांनी भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय हॉकी संघाने ब्रिटनच्या संघावर 3-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत आगेकूच केली. 1972 नंतर पहिल्यांदाच भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक यांनी प्रत्येकी एक गोल करत भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत 8 सुवर्णपदकं आहेत. शेवटचं पदक 1980 मध्ये भारताने मिळवलं होतं. त्यावेळी उपांत्य फेरी नव्हती.