. . . तर पुन्हा लॉक डाउन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच मुंबईत (Mumbai) आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. तसंच कोरोना नियमांचे पालन न केल्यास तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, असेही ते म्हणाले. आज (शनिवार, 21 ऑगस्ट) कालिना येथे बाल कोविड सेंटरच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. या संकटावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मात करायची आहे. मात्र, आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो आणि नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राज्यात ऑक्सिजन साठ्यात हवी तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याने उपलब्ध असलेल्या साठ्यापर्यंत आपण पोहचलो  आणि पुन्हा ऑक्सिजनची गरज भासू लागली तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल.