
आज सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीला बघता गर्दी न करता साध्या पद्धतीने विसर्जन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.तरी ही काही मंडळे नियमांचे उल्लंघन करत असताना दिसत आहे.मानाच्या गणपतीचे विर्सजन देखील उत्सव मंडपात करण्याचे निर्णय घेतले गेले होते.पण पुण्याच्या मानाच्या 5 गणपतीपैकी एक असलेल्या तुळशीबागेतील गणपतीच्या विसर्जनाला भाविकांची गर्दी आणि ढोल ताशांसह मिरवणूक बघायला मिळाली.या त्यानंतर ढोल ताश्यासह बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीला बघता यंदाच्या वर्षी अगदी साध्या पद्धतीने गणपती विसर्जन मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन पोलीस आणि राज्य सरकारने दिले होते.
पुण्यात देखील नियम मोडले असताना पोलिसांनी त्या स्थळी जाऊन कायदेशीर पद्धतीने ढोल ताशे पथकाला रोखले आणि कार्यकर्त्यांना कारवाई करण्याचे संकेत देऊन ढोल ताशा साहित्ये जप्त केले.यावर पोलीस आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली.पण नंतर मंडळाचे विश्वस्तांनी विनंती केल्यावर पोलिसांनी त्यांना ताकीद देऊन कोणतीही कारवाई न करण्याचे सांगितले.
गर्दी न वाढवता, प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या फक्त 10 कार्यकर्त्यांना गणपती बाप्पासह विसर्जनासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईच्या प्रसिद्ध लालबाग राजाच्या विसर्जनाची तयारीही सुरू आहे. मुंबईतील बरीच मोठी सार्वजनिक गणेश मंडळे गिरगाव चौपाटीवर बाप्पाचे विसर्जन करतात. दरवर्षी ज्या मार्गाने लालबागचे राजा विसर्जनासाठी जातात, यंदाही लालबाग चे राजा त्याच मार्गांनी जातील. परंतु कोरोनामुळे जारी करण्यात आलेले नियम पाहता मुंबईत गणेश विसर्जनाच्या वेळी वर्षानुवर्षे दिसणाऱ्या विसर्जनामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येणार नाही.
दरम्यान, लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. उत्तर: आरती झाली आहे. दरवर्षी प्रमाणे, ढोल आणि ताशे
देखील पूर्ण उत्साहाने वाजवले जात आहेत. लालबागच्या राजाला शेवटच्या दर्शनासाठी लोक जवळच्या इमारतींमधून डोकावत आहेत.






