रोमहर्षक सामन्यात कोलकाता 2 विकेटने पराभूत, CSK नंबर एक

अबू धाबी येथे रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरोधात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने 2 विकेटने मात आणि आयपीएल 14 च्या प्लेऑफ फेरीतील स्थान निश्चित केले. केकेआर विरुद्ध सीएसकेच्या या विजयासह प्लेऑफ शर्यत रंगतदार स्थितीत पोहचली आहे. चेन्नईच्या विजयात रवींद्र जडेजाने निर्णायक भूमिका बजावली. जडेजा 8 चेंडूत 22 धावा करून निर्णायक क्षणी सामन्याचा निकाल बदलला. चेन्नईचा 10 सामन्यातील हा आठवा विजय ठरला असून त्यांनी एकूण 16 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक गाठला आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे देखील तितक्याच सामन्यात 16 गुण आहेत मात्र, चेन्नई नेट रनरेटने आघाडीवर पोहचली आहे. तसेच कोलकाता चौथ्या स्थानावर कायम आहे. सुपर किंग्ससाठी या सामन्यात फाफ डु प्लेसिसने 43 धावा केल्या तर रुतुराज गायकवाडने 40 धावा केल्या. याशिवाय मोईन अलीने 32 धावा केल्या आणि धावांचे नाबाद  योगदान दिले. दुसरीकडे, केकेआरसाठी आंद्रे रसेल, प्रसिद्ध कृष्णा आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

यापूर्वी केकेआरसाठी तसेच मागील काही सामन्यात मैदान गाजवणारे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर आज खास कामगिरी करु शकले नाही. राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा वगळता इतर फलंदाज अधिक धावा करु शकले नाहीत. त्रिपाठीने सर्वाधिक 45 तर राणाने 37 धावा केल्या. पण अखेरच्या क्षणी दिनेश कार्तिकने 11 चेंडूमध्ये केलेले 26 धावा केकेआरसाठी महत्त्वाचे ठरले आणि संघाने चेन्नईविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या गाठली. पण अंतिम क्षणी जडेजाने कोलकाताच्या तोंडून विजयाचा घास काढून घेतला.