
पाकिस्तानने (Pakistan) रविवारी नवा इतिहास रचला. बाबर आजमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तान संघाने टी-20 विश्वचषक 2021 च्या शानदार सामन्यात भारताचा (India) 10 गडी राखून पराभव केला. आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. सामन्यात पहिले फलंदाजी करताना भारताने दुबईच्या (Dubai) मैदानावर 152 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरात पाकिस्तान सलामीवीरांनी कोणतीही विकेट न गमावता 17.5 षटकांत विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खूपच निराश दिसला. भारतीय संघाच्या या पराभवामुळे विराट कोहली आता ICC विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना हरणारा 29 वर्षांतील पहिला कर्णधार बनला आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अनेक पिढ्यांनी या विजयाची वाट पाहिली होती आणि आता त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या पराभवानंतर कर्णधार कोहलीच्या चेहऱ्यावर नैराश्य आणि दबाव स्पष्ट दिसत होता. कर्णधार कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावले पण ते संघासाठी अपुरे ठरले.











