
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवलीमधील (Kalyan-Dombivali) भाजपच्या (BJP) तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. यात भाजपचे डोंबिवलीमधील नगरसेवक महेश पाटील, (Mahesh Patil) सायली विचारे (Sayali Vichare) आणि सुनीता पाटील (Sunita Patil) यांचा समावेश आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.











