
गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांनी काढलेल्या फोटोतून आज जगातल्या सर्वांत उंच ठिकाणीसुद्धा अशी स्थिती नाही, हे दिसून येईल. एव्हरेस्ट शिखराजवळचा परिसर लोकांनी गजबजून गेलेला तुम्हाला दिसून येईल.
एव्हरेस्टजवळ या हंगामात 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मल यांच्या फोटोंनी सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोंमुळे जगातील सर्वोच्च शिखराच्या जवळ गिर्यारोहक किती अवघड परिस्थितीचा सामना करतात, याचं एक उदाहरण समोर आलं आहे
गिर्योराहणाच्या मोहिमा आता लोकप्रिय झाल्यामुळं एव्हरेस्टवर गर्दी वाढत चालल्याचं तज्ज्ञ सांगतात.
एका मोहिमेच्या गाईड उर्सिना झिमरमन यांनी एव्हरेस्टवर 2016 साली चढाई केली होती. त्या म्हणाल्या, “अशा प्रकारचे ट्रॅफिक जॅम योग्य तयारी नसलेल्या गिर्यारोहकांमुळे होते. हे गिर्यारोहक चढाई करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट नसतात. यामुळे केवळ त्यांच्या जीवाला धोका पोहोचतो असं नाही तर त्यांना एव्हरेस्टवर घेऊन जाणाऱ्या शेर्पांचाही जीव धोक्यात येतो.”






