आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात होणार आहे. काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर आज सादर होणार्‍या बजेट कडून सर्वसामान्यांना आशा आहेत. करदाते, शेतकरी, आरोग्य यंत्रणा या बाबत यंदाच्या बजेटमध्ये काय घोषणा होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मग हा अर्थसंकल्प ऑनलाईन थेट पाहण्यासाठी तुम्ही डीडी च्या अधिकृत युट्युब चॅनेलला भेट देऊ शकता. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 लोकसभा टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय डीडी न्यूजवर लाइव्ह देखील पाहता येईल. अर्थसंकल्प त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरही लाइव्ह दाखवण्यात येईल.