
मुंबई आणि नवी मुंबई विभागात बेकरी प्रॉडक्ट साठी कार्यशाळेचे आयोजन
प्रगती फाउंडेशन मुंबई (रजि) यांच्या सौजन्याने आणि b4u यांच्या सामाजिक दायित्व सहकार्याने मुंबई व नवी मुंबई येथील तीन ठिकाणी अनुक्रमे नेरूळ जुईनगर आणि कुर्ला येथे गरजू महिलांकरता आणि बचत गटातील महिलांकरता “उड्डाण – एक झेप स्वावलंबनाकडे ” या कार्यक्रमा अंतर्गत दोन दिवसीय पाककृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

सदर कार्यशाळा दिनांक 6 एप्रिल 2020 पासून दिनांक 12 एप्रिल 2022 पर्यंत सुरू राहणार आहेत.
यापैकी पहिली पाककृती कार्यशाळा नवी मुंबई येथील नेरूळ अभिनंदन हॉल सेक्टर 2 या ठिकाणी पार पडली. दिनांक 6 एप्रिल आणि 7 एप्रिल दुपारी एक ते चार या वेळेमध्ये सदर कार्यशाळा घेण्यात आली.
पाककलेच्या या कार्यशाळेत बेकरी पदार्थ बनविणे शिकवली जात आहे यामध्ये प्रामुख्याने केक बनविणे, चॉकलेट बनविणे आणि बिस्कीट बनवणे या पदार्थांचा समावेश आहे.

दोन दिवसीय पाककला कार्यशाळेत पहिल्या दिवशी पदार्थ शिकवले जातात आणि दुसऱ्या दिवशी महिलांना पदार्थ स्वतः बनवून दाखवायचे आहेत यासाठी खास स्पर्धेचे आयोजन केलं आहे विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले.
याशिवाय फक्त पदार्थ बनविण्यास नव्हे तर बनविलेल्या पदार्थाचा उपयोग करुन आपला उद्योग सुरू करण्या करता कसा होईल याकरिता मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे. बचत गटातील महिलांनी खासकरून बचत गट म्हणन आपला स्वतंत्र व्यवसाय या पाक कलेच्या माध्यमातून कसा सुरु करावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
नेरूळ येथील कार्यशाळेत महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अभिजित देसाई (मनसे न मू शहर सचिव) तसेच गजानन काळे (मनसे न.मूं शहर अध्यक्ष) आणि अनुष्का देसाई (समाजसेविका) यांच्या उपस्थितीत नेरूळ येथील कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किरण राणे आणि कार्यकारी संचालिका सिद्धी राणे तसेच इतर सहकारी उपस्थित होते.

महिलांना मार्गदर्शन करण्याकरिता बचत गट तज्ञ आणि लक्ष पूर्ती बचत गटाच्या प्रमुख मंजुषा परब यांना आमंत्रित करण्यात आले होते. बचत गट कशाप्रकारे बनवावे तसेच बचत गटाने सरकारी योजनांचा कशाप्रकारे लाभ घ्यावा आणि कला कौशल्य आत्मसात झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा या बद्दलचे सखोल मार्गदर्शन मंजुषा परब यांनी केले.
अध्यक्ष श्री किरण राणे यांनी “उड्डाण – एक झेप स्वावलंबनाकडे” ही योजना का सुरू केली याबद्दलचे मार्गदर्शन केले तसेच या कार्यशाळेतून महील नवउद्योजक निर्माण व्हावेत अशी आशा व्यक्त केली.
केक बनवणाऱ्या स्पर्धेत भाग घेऊन विजेते झालेल्या महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले तसेच कार्यशाळेत सहभागी होऊन यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सिद्धी राणे यांनी केले तसेच कार्यशाळेत उपस्थित सहभागी महिलांना रेश्मा शिंदे आणि वैशाली पाटील यांनी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडली.












