
नवी मुंबई शिवसेना शिव वाहतूकसेवा, नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था प्रमुख श्री विजयजी नाहटा (शिवसेना उपनेते तथा राज्य मंत्री) यांच्या विशेष सहकार्याने श्री दिलिप किसनराव आमले (अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबई) यांच्या सहाय्याने १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने नेरूळ विभागातील रिक्षा चालक यांचा आदर्श सन्मान करण्यात आला.
यामध्ये प्राथमिक व्यवसाय , व्यसन मुक्ती , स्वच्छ कपडे, उत्कृष्ट रिक्षा चालक , उत्कृष्ट रिक्षा ,प्रामाणिक रिक्षा चालक तसेच तसेच रिक्षा मध्ये विसरून राहिलेले सामान परत केलेले प्रामाणिक रिक्षा चालक यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच साईबाबा रिक्षा स्टँड सेक्टर १० नेरूळ येथे विभागातील नागरिक व रिक्षा चालक यांच्या साठी मोफत आरोग्य झेन हेल्थ शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या माध्यमातून शारीरिक वजन , ब्लड प्रेशर तसेच डायबेडीस सारख्या अशाप्रकारे अनेक शारीरिक आरोग्याची मोफत तपासणी शेकडो रिक्षा चालक तसेच नागरिकांनी केली.
मोफत झेन हेल्थ आरोग्याचे उद्यघाटन शिवसेना विभाग प्रमुख नगरसेवक श्री रतन मांडवे तसेच श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबई यांच्या उपस्थितीत स्वताची शारीरिक तपासणी करून झाले.
कार्यक्रमात श्री सोपान जेजुरकर श्री शोभनाथ पांडे श्री मोहन शेलार श्री कांत जाधव श्री भानुदास जेजुरकर श्री सोपान दिघे श्री ज्ञानेश्वर काळे श्री तुकाराम कोडे या सर्वानी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमत उपस्थित राहिलेले सर्वाचे आभार श्री दिलिप किसनराव आमले यांनी मानले.











