
मला भावलेल्या शांतताप्रिय कॅनडा देशाविषयी थोडक्यात रेखाटन – डॉ भास्कर धाटावकर
कॅनडा हा देश उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असून तो तीन प्रादेशिक आणि दहा प्रातांत विभागला आहे.पुर्वेस अटलांटिक महासागर, उत्तरेस आर्विर्टिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर एकूण क्षेत्रफळ 99.8 लाख एव्हढे आहे.भौगोलिक बाबतीत तो दुसर्या स्थानावर आहे.जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा नायगारा नदीने 8861 कि.मी.केली आहे.
कॅनडाची राजधानी ओटावा असून टोरांटो, व्हन्कुव्हर, माॅन्टरियल ही प्रमुख शहरे आहेत. फ्रेंच आणि इंग्लिश ही प्रमुख भाषा आहे. काही ठिकाणी स्पनीशही बोलली जाते.
इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी राष्ट्रप्रुमख आहे. 1 जुलै 1867 कॅनडा स्वतंत्र झाला.38030900 लोकसंख्या क्षेत्रफळानुसार ती फारच विरल आहे.
अमेरिकेने कॅनडावर दोन वेळा हल्ला केला पण तिलाच पराभव स्विकारावा लागला. येथेही अनेक धर्माचे लोक गुण्यागोविदांनी राहात आहेत. एक शांतताप्रिय देश अशी कॅनडाची जगात ओळख आहे.

कॅनडा हे नाव इराक्वास जमातीतील गाव किंवा वाडी या अर्थाच्या शब्दातून आला आहे.तिन्ही बाजूने समुद्र आहे. जगातील पाणीसाठ्या पैकी वीसटक्के पाणी कॅनडात आहे.अॅटोंरियन लेक सागरच भासतो.कॅनडाच्या कोणत्याही भागातून तो दिसतो.पारदर्शी स्वच्छ पाणी हे त्याचे खास वैशिष्ट्य.
येथे लक्षणीय शांतताप्रिय वातावरण, समाजकारण, आणि राजकारण आणि वैयक्तिक प्रगती करण्याची सुसंधी,शिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा आणि नोकरी व्यापार उद्योगातील शक्यतेमुळे जगातील अनेक देशातील लोक आपले नशीब अजमावण्यासाठी आले आहेत. त्यात भारतीयांचा वाटा फार मोठा आहे.येथील ब्राम्पटन शहर तर मिनी पंजाबच आहे.
कॅनडात प्रत्येक प्रादेशिक विभागाना आणि प्रातांना आपआपले शैक्षणिक धोरण ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे.सर्व शाळा या शासकीय असतात.प्रायमरी शिक्षणानतंर विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊनच विद्यापीठात प्रवेश दिला जातो.शिक्षणाचा खर्च शासन करते.शिक्षणासाठी कर्ज, शिष्यवृती मिळतात.थोडक्यात सर्व सुविधा विना अडथळता न करता मिळतात ,संशोधनास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते.त्यामुळेच 52% लोक येथे उच्चशिक्षित आहेत.

आज कॅनडा व्यापार उद्योगात जगातील पहिल्या दहा देशातील एक आहे.आर्थिक स्थिती मिश्र स्वरूपाची असून अलीकडेच हेरिटेज फाऊंडेशनने या देशाला आर्थिक स्वातंत्र्याबाबतीत अमेरिकेच्या खाली तर युरोपियन देशापेक्षा वरचा क्रमांक दिला आहे.
डाॅ. भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन












