मला भावलेल्या शांतताप्रिय कॅनडा: डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 7

कॅनडातील इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना

भारताच्या इतिहासाचे प्राचीनत्व सांगण्यासाठी आपल्याकडे खूप पुरातत्वीय पुरावे,साधने,त्या काळातील नांदून गेलेल्या संस्कृती,अगदी रामायण, महाभारत इत्यादींचा आपण सहज संदर्भ देत असतो.जगभरातील अनेक संस्कृतींचा अभ्यास मानववंश शास्त्रज्ञ करीत असतातच.मी सध्या कॅनडातील मिसीसागा शहरात माझ्या मोठ्या मुलाकडे वास्तव्यास आलो आहे माझ्या कॅनडा देशाचा इतिहास उत्कंटतेपोटी जाणून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

काही इतिहासकारांच्या मते कॅनडाचा इतिहास हा 30 हजार वर्षापासूनचा असल्याचा दावा करीत आहेत. त्यासाठी ते अश्मयुगीन युगापासून दाखले देतात. येथे कॅनडाच्या इतिहासाचे प्राचीनत्व थोडे बाजूलाच ठेवून कॅनडाचा आधुनिक इतिहास मात्र 1535 पासून निर्विवाद पणे सुरू होतो यात काहीच शंका नाही. सध्याचे जे क्यूबेक बदंर आहे ते फ्रेंच नागरिक जॅक कार्टीयरने क्यूबेक यानी बांधले आणि त्याचेच नाव या बंदराला देण्यात आले. राष्ट्रप्रुमख म्हणून वर्चस्व कोणाचे?धर्म संस्थेचे कि राजसत्तेचं या झगड्यात धर्म संस्थाचे जोखड बाजूला करण्यात राजसंस्थेला यश आले.तत्पूर्वीच या वादाला दोन्ही यंत्रणेतील दमनपध्यतीला कंटाळून गेलेले काहीनी नवनवीन अपरिचित भूखंडाचा शोध घेणे त्यावर आपले स्वामित्व प्रस्थापित करणे सुरू झाले.

America-Canada Border
अनेक युरोपियन देश अग्रेसर होतेच आणि अमेरिकेचा शोध, सुरूवातीला वसाहतीचे राज्य नतंर अमेरिकन स्वातंत्र्य युध्द या घडामोडी बरोबर कॅनडातील भूभागाचा शोध लागला होता आणि त्यावर निर्णायकी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि साम्राज्यवादी इंग्लंड यांच्यात अनेक वेळा संर्घष झाला.अमेरिकेने कॅनडावर दोन मोठ्या लढाया केल्या पण त्याना हार पत्कारावी लागली अखेर 1774 ब्रिटिशाकडे सत्ता आली.फ्रेंचानीसुध्दा हार मान्य केली त्यांचे नागरी कायदे आणि धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले आणि कॅनडाचे स्वातंत्र्य इंग्लंडनी 1 जुलै 1864 मध्ये जाहीर केले.इंग्लंडची राणी घटनात्मक प्रमुख झाली आहे.
Anciant Canada (Imaginary Picture)
येथील हवामान प्रादेशिक बदलाद्वारे चिन्हांकित होत असते.सागरी भागातील तापमानावर तेथील गृहीतके ठरविण्यात येतात. सर्वसाधारणत: कॅनडात चार महिने तुफान बर्फवृष्टी होते तर उत्तर भाग हा वर्षभर बर्फाने झाकलेला असतो.येथे नयनरम्य सागरकिनारे आहेत, घनदाट वनराई, वन्यजीव, जंगले आणि त्यात वास्तव्यास असलेले ट्रंका मधील ध्रुवीय अस्वल, रेनडियर, कस्तुरी बैल,गायी,लांडगे,कोल्हे,हरणे,ससे असे विविध प्राणी जीव विपुल प्रमाणात आढळून येतात. येथील मुख्य भूमीवर मुळनिवासी लोकांच्या संस्कृती बरोबर 70 च्या दशकात कॅनडाने बहु सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे.मोठ्या संख्येने ब्रॅण्ड, दुकाने,शॉपिंग सेंटर, माॅल्स आनंददायी वातावरण तयार केले आहे.
Toronto’s Central Park

मनोरंजनाची अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या. ओटारियाची राजधानी असलेल्या टोरांटो येथील तलावावर नयनरम्य बेट तयार करून एका अद्ययावत, अद्भुत सेंट्रल पार्कची निर्मीती करण्यात आली आहे.त्याला दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. एक लक्झरी फेरी बोट या पार्क वर घेऊन जाते आणि तेथील स्वर्गीय आनंदाचा लयलूट करतात.या पार्क विषयी स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. याचबरोबर बिग बेअर लेक आणि जगप्रसिद्ध नायगारा लेक कॅनडाच्या बाजूने पर्यटकांना विस्मतित आनंद देत असतो त्याच्यापुढेच असलेला नायगारा व्हिलेज तेथील ग्रामीण भागातील रचना कशी असते याची कल्पना देते.तेथील आईस्क्रिम व्हरायटीज हा एक विलक्षण अनुभव असतो.

Nigara Falls in Ontario

आता कॅनडीयन संस्कृतीवर अमेरिकेन संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसत असलातरी कॅनडाने आपली संस्कृती जपली आहे.संगीत जगतातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे आर्केस्ट्रे त्यात क्यूबेक, टोरांटो,माॅन्टरियल सिंफनीचा आर्वजून उल्लेख करावाच लागतो.अशा या शांतताप्रिय कॅनडात जगभरातील नागरिक आर्कषित होत आहेत. एक वेगळीच अनुभूती मिळते.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.