मला भावलेल्या शांतताप्रिय कॅनडा: डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 6

कॅनडाची राजकीय ,प्रादेशिक, प्रशासकीय रचना आणि लोक जीवन

कॅनडाची राज्य रचना ही घटनात्मक राजेशाही आहे.1 जुलै 1867 रोजी कॅनडाला स्वातंत्र्य मिळाले पण त्यानी ब्रिटनचे स्वामित्व मानले आहे.इंग्लंडची राणी कॅनडाची प्रमुख आहे.देशातील हितसंबंध विषयक बाबी पहाण्यासाठी गव्हर्नर जनरल प्रतिनिधित्व करतात. कार्यकारी शक्ती मात्र पंतप्रधान असून ते ससंदेच्या मदतीनेच कारभार पाहातात.यांच्या हातीच देशाच्या राजकारणाचे,धोरणात्मक निर्णयाचे व प्रशासकीय अमंल बजावणीचे सुकाणू असते.

कॅनडाची रचना भौगोलिक स्थितीनुसार आणि लोक संख्येनुसार दहा क्षेत्रात विभागले आहे.प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र वैधानिक उपकरण आणि प्रशासकीय यंत्रणा आहे.प्रिन्स एडवर्ड आयर्लंड, न्यू फाऊडलॅड ,न्यू ब्रसविक, नोव्हेंबर स्काॅशिया, सस्केचेवान, मॅनीरोबा , अल्लाची ,ब्रिटिश कोलंबिया, क्यूबेक आणि ऑटोरिया असे प्रांत असून ओटावा ही राजधानी आहे.मात्र भारतात जसे मुंबईला आर्थिक ह्यष्टया जसे महत्त्व आहे तसेच महत्त्व टोरांटो या शहराला आहे.

कॅनडात व्यापक लोकसंख्या कॅथलिक लोकांची आहे.तर मुस्लिम आणि ज्यु समाज दोन टक्के आहे.अलीकडील खुल्या इमिग्रेशन धोरणामुळेच बौद्ध, हिंदु,आणि शीखांची संख्या लक्षणीय वाढली आहे.यातील ब्राम्पटन शहर तर मिनी पंजाबच वाटतो.दरवर्षी तीस हजार भारतीय नागरिक पीआर घेऊन कॅनडात येत आहेत. मुळ कॅथलिक लोकांपैकी तेरा टक्के कॅनडीयन स्वताला नास्तिक समजतात.

येथील अधिकृत भाषा इंग्रजी,आणि फ्रेंच असून इतरही अनेक भाषा वेगवेगळ्या देशातून आलेले लोक बोलतात त्यात आपली पंजाबी आणि काही अंशी हिंदीचाही समावेश करावा लागेल. येथे अनेक धर्माच्या सणानुसार सुट्टया दिल्या जातात जोडीला प्रत्येक प्रातांच्या सुट्टया असतात तर काही ठराविक राष्ट्रीय काॅमन सुट्टी असते.स्वातंत्र्य दिन,नाताळ,1 जानेवारी,गुड फ्रायडे, 11 नोव्हेंबर इत्यादी.तथाकथित लांब सुट्टी शनिवार ,रविवार आणि त्याला जोडून एखादी सुट्टी मंगळवारी असेल तर ती शनिवार/ रविवारला जोडून देतात याचे कारण म्हणजे टूरीझमला बढावा देण्याचे धोरण असते. कॅनडायिन डाॅलर हे इथले असून एक डाॅलर भारतीय रूपयाच्या 62/ रूपया बरोबर आहे.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन