
कॅनडातील बाजूने नायगारा फाॅल्सला पुन्हा भेट
रविवारची नियोजित कामे उरकल्यावर राहुलनी नायगरा फाॅल्सला जाण्याचे ठरविले. फटाफट सर्वजण तयार झाले.पारूल लंचचे पार्सल ऑर्डर केले.”लकीला” सोबत न्यायचे ठरले.
मिसीसागाहून नायागारा फाॅल्स दिडएक तासाच्या अंतरावर आहे. प्रवास सुरू झाल्यानंतर लक्षात आले कि जोडून सुट्टया असल्याने ट्रफीक जॅम झाले होते.जसे काही सारेच मिसीसागातील निवासी नायगारा फाॅल्स पाहाण्यासाठी निघाले होते.
आम्ही एका विशाल सर्व सोयी युक्त पार्क मध्ये लंच घेतले.तेथेही गर्दी होतीच.हिंदी,पजांबी गाण्यावर भारतीय वंशाचे पर्यटक ताल धरून डोलत होते.नाचत होते.”जरासा झूम झूम ले” चालले होते.
आम्ही आज प्रथम विनीयार्ड ,वायनरी,द्राक्षांचे मळे, पेर फळांच्या ,मेपल वृक्षांच्या किलोमीटर लांबीच्या हिरव्यागार बागा,त्या शेतकऱ्यांची टुमदार बंगले,वायनरी,पर्यटकांना तेथेच राहाण्याची करून दिलेली सोय.ताज्या फुलांच्या, फलांच्या विक्रीचे स्टॉल्स,त्यांचे हसत मुखाने विक्री करणार्यां मुली! मला काही फोटोज घ्यायचे होते पण येथे खाजगी प्रापर्टीचे फोटो मालकाच्या परवानगीशिवाय घेता येत नाही.तो हिरव्यागार शालू नेसलेल्यागत दृष्टीस सुखावणारी नजारा डोळ्यात साठवून ठेवला.
त्यानंतर नायगाव व्हिलेजला भेट आणि काऊज आईस्क्रीमचा आस्वाद घेऊन ऑटोंरियन लेकच्या तटावर पारदर्शी पाण्यात पाय सोडून तेथील माशांना न्याहाळणे झाले.
पुढील आमचा पडाव होता तो नायगारा नदी जेथे बर्यापैकी आकार घेते तेथे झाला.त्या ठिकाणाला “बेंड” असे म्हणतात. हिरव्यागार वनराजीचा वरदान तर अख्या कॅनडाला लाभला आहे.जगाच्या वीस टक्के पाणीसाठा त्यांच्या वाटेला आला आहे.
क्रमश: डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन










