
फायझर – बायोएनटेकच्या लशीला युकेमध्ये मान्यता देण्यात आलीय. कोव्हिड 19वरच्या एखाद्या लशीला मान्यता देणारा युनायटेड किंग्डम हा जगातला पहिला देश ठरलाय.
कोव्हिडपासून 95% पर्यंत संरक्षण देणारी ही लस वापरासाठी सुरक्षित असल्याचं युकेच्या औषध नियामक – MHRA ने म्हटलंय.
या लशीला मान्यता मिळाल्याने आता ‘हाय प्रायॉरिटी’ गटांसाठी म्हणजेच कोव्हिड होण्याचा धोका जास्त असणाऱ्यांसाठीची लसीकरण मोहीम युकेमध्ये काही दिवसांतच सुरू होऊ शकेल.
फायझर – बायोएनटेकच्या लशीचे 4 कोटी डोसेस युकेने यापूर्वीच ऑर्डर केलेले आहेत. या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना ही लस देता येईल.
यापैकी 1 कोटी डोस येत्या काही दिवसांत युकेमध्ये उपलब्ध होणार आहेत.
10 महिन्यांच्या कालावधीत ही लस विकसित करण्यात आलीय.











