मला भावलेला शांतताप्रिय कॅनडा : डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 19 (कॅनडातील बाजूने नायगारा फाॅल्सला पुन्हा भेट – 2)

कॅनडातील बाजूने नायगरा फाॅल्सला पुन्हा भेट-भाग 2

अखेर त्या निर्सग निर्मित जगभरातील रसिकांचे आकर्षण ठरलेल्या आणि लाखो पर्यटक ज्याला भेट देण्यास आतुर असतात त्या नायगारा फाॅल्स जवळ, अमेरिकेन साइडनी दिसणाऱ्या रेनबो ब्रिज जवळ आम्ही पोचलो. त्याचवेळी नायगारा नदीवर बांधण्यात आलेल्या महाकाय लोखंडी ब्रिज वरून अमेरिकेन बाजूने रेल्वे धडधडत आली.

अमेरिका आणि कॅनडा या दोन राष्ट्रांची सीमा रेषा या नायगारा नदीमुळे नैसर्गिक रित्या केली आहे. हीच सीमारेषा आहे या नायगारा नदीवर अनेक रेल्वे पूल आणि बायरोड मार्गाने जाण्यासाठी अनेक पूलांची निर्मिती करून त्या माध्यमातून दोन्ही देशांचे दळणवळण जोडण्यात आले आहेत आणि दोन्ही राष्ट्रांकडून चांगल्या प्रकारे तालमेल ठेवण्यात आला आहे.

आज येथे जनसागर उसळला होता.सर्वात अडचण कारपार्कींगची म्हणून आम्ही उतरून कॅनडातील हाॅर्सोई फाॅल्स कडे चालत राहीलो.नीवाच्या हाती आम्हा आजी,आजोबा नि नाना,नानीचे नेतृत्व होते. ती कार पार्कींगच्या शोधात असलेल्या राहुल, पारूलला आमचे लोकेशन देत होती. अवनी लिश मध्ये बांधलेल्या लकीला सांभाळीत होती. थोड्या वेळाने त्यांनी ही अटजबाबदारी आपसात बदलून घेतली.

किती अतंर चालायचे आहे समजत नव्हते, पाय थकले होते पण मनं मात्र त्या फेसाळलेल्या पाण्याच्या तुषारांनी आनंदाने न्हावून निघत होते त्यामुळेच दमल्या,थकल्याचे भान नव्हते,अनेक जण बेभान पणे आनंद लुटत होते.एकीकडे नायगारा नदीच्या विशाल पात्रातून रेड निशाण कॅनडाचे आणि ब्लू निशाण लावलेले क्रुझ डौलाने चालत होते. क्रुझवरील प्रवाशांचे रेनकोटही त्या त्या देशाच्या निशाण प्रमाणे दिले जातात. काही ठिकाणी हे दोन्ही देशांचे क्रुझ एकमेकांच्या हद्दीत विना पासपोर्ट फक्त क्रुझ मध्ये बसून प्रवास करू शकतो.

तर आम्ही कॅनडातील मुख्य हाॅर्सोई फाॅल्स जवळ पोचलो आणि तो नजारा,ती इंद्रधनुष्याची पडणारी नि आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारी कमान,उडणारे तुषार, मध्येच रगांची होणारी उधळण, सारेच अद्भुत! येथे भास्कर लवकर विश्रांती घेत नाही.कदाचित येथे आलेल्या लाखो लाखो रसिकांना जास्तीत जास्त लेट ड्युटी करून प्रकाश देत असतो.आम्ही सारे डोळ्यात साठवून ठेवत होतो तसेच मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद करून ठेवीत होतो.

मन तृप्त होऊन गेले होते. ग्रुप फोटो झाले. काही आठवणी साठी नायगारा संबंधित सुविनियर विकत घेतले.आणि वेलकम पार्क मध्ये पोचलो आणि इनक्लायीन लिप्ट मधून प्रचंड मोठ्या कॅसीनोत प्रवेश केला.

आता रात्रीचे साडेआठ वाजले होते.आम्ही पॅरामाउंट हाॅटेलात डिनर घेतले.येथेही खूप गर्दी होतीच.पुन्हा डिक्लाईन लिफ्टने खाली.या दोन मिनिटात खाली ,वर येणारे लिफ्टचे तिकीट फक्त पन्नास कॅनडीयन डाॅलर, साधारणत: तीन हजार रूपये मात्र.

आता आम्ही रात्री कॅनडाने जेथून मुख्य (हाॅर्सोई , हार्स शू आकारात) धबधब्याच्या पाठीमागे अंधार राहील पण तेथे जी रोषणाई केली आहे. तिच्या विविध रंगाची उधळण तुषारांवर पडेल.हे पाहून मी धन्य झालो.राहुलला अनेक धन्यवाद दिले.पुन्हा कार पार्किंग पर्यंत स्वतःलाच ओढीत नेले.

आज मी सकाळपासून ते आता पर्यंत हातावरच्या घड्याळातील किती चाललो ह्या दाखविणाऱ्या दर्शिकेनुसार आठ किलोमीटर चाललो होतो.माझा महिन्याचा कोटाच झाला होता. परतीचा प्रवास सुरू झाला.भन्नाट वेगात सव्वातासात एकशे तीस किलोमीटरचे अंतर कापून आम्ही घरी पोचलो.रात्रीचे बारा वाजून गेले होते.

आज मला डायरी लिहीण्याची क्षमता राहीली नव्हती.मी बेडरूम मध्ये तो कॅनडातील बाजूने पुन्हा पाहिलेल्या नायगारा फाॅल्स नजरेसमोर आणीत होतो.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन