सॅमसंग’ला टाकलं मागे

‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालानुसार 2019च्या दुसऱ्या तिमाहीत शाओमीचा देशातील स्मार्टफोन बाजारात हिस्सा 28 टक्क्यांवर आला आहे. उलट गेल्या वर्षी कंपनीचा बाजारहिस्सा 31 टक्के होता. तरीही ते अव्वल क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेल्या Realme कंपनीने देखील लक्षणीय आगेकूच केल्याचं पाहायला मिळत आहे. या कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हिस्सा 9 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी Realme चा बाजारातील हिस्सा 7 टक्के होता. दोन टक्क्यांच्या वाढीसह Realme ने या यादीत चौथा क्रमांक पटकावलाय. दुसऱ्या क्रमांकावर 25 टक्के हिस्सा असलेली सॅमसंग आणि तिसऱ्या क्रमाकावर 11 टक्के हिस्सा असलेली विवो कंपनी आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर ओप्पो ही कंपनी आहे. ओप्पोचा देशातील स्मार्टफोन बाजारातील हिस्सा 8 टक्के आहे.