
गणपती बाप्पाचे धुमधड्याक्यात स्वागत : देशभर अभूतपूर्व उत्साह , कोकणातही यंदा गणेशत्सोव जोरात !
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे सर्व सण आणि उत्सावावर मर्यादा आल्या होत्या. यंदा सारेच सण जोषात आणि धुमधड्याक्यात साजरे होताना दिसत आहेत.
कृष्णाजान्माष्ठामी नंतर आता देशभर गणेशोत्सव देखील धुमधड्याक्यात साजरा होत आहे. गणेश चतुर्थी दिवशी राज्यभर अनेक घराघरातून गणेश मूर्तींचे आगमन झाले आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील यंदा उंचच उंच मूर्ती विविध देखाव्यासहित मंडपात विराजमान केलेल्या दिसत आहेत.
यंदा गणेशोत्सव कोणत्याही बंधनाविरहित पार पडत आहे, त्यामुळे नागरिकांमध्येही एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. कोकणात देखील प्रत्येक घराघरात पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे.
विविध कलाकार, नेते मंडळी आणि सेलेब्रेटीज यांच्या घरी देखील झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , शरद पवार इत्यादी सर्वच नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.
दीड दिवसाच्या बापाचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीकडे देखावे आणि उंचच उंच मूर्ती पाहण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसाच्या पहाटेपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. भक्तांमध्ये यंदा बाप्पासाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे.






