
ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये शिवसेनेचे चिन्ह वाटप करण्याचा निर्णय घेण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने (SC) निवडणूक आयोगाला (ECI) दिली.
आज सर्वोच न्यायालयात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कोणत्या गटाला ‘खरा’ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता द्यायची आणि धनुष्यबाण चिन्हाचे वाटप करायचे हे ठरवण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिली. ‘खरी’ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या शिंदे गटाच्या दाव्यावर भारतीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
यावर माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार (ठाकरे गट) अरविंद सावंत म्हणाले, “आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. निवडणुक आयोग (ECI) आपला निर्णय देऊ शकते असे म्हटले आहे. तो धक्का बसण्याचा प्रश्न नाही. अपात्रतेबाबतचा खटला सुप्रीम कोर्टात सुरूच राहणार आहे. असेही ते म्हणाले.
याबाबत वास्तविक एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा देताना, शिवसेना चिन्ह प्रकरणी भारतीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
‘खरी’ शिवसेना कोण यासंदर्भात कार्यवाही करण्यास निवडणूक आयोग ( ECI ) ला परवानगी देण्यात आली आहे. त्यामूळे निवडणुक आयोग आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











