
ऑस्ट्रेलियातील राहाणीमान, येथील विस्तीर्ण भूमीवरील अतिशय विरल असलेली लोकसंख्या, निसर्गाने हातचे काही राखून न ठेवता दिलेले सृष्टीसौंदर्य, विपुल खनिज साठे,अथांग महासागर, घनदाट जंगल आणि त्यातील वनसंपत्ती आणि वास्तव्य करून राहाणाऱ्या दुर्मीळ अशा अनेक पशुपक्षांच्या प्रजाती ! या साऱ्यांची माहिती थोडक्यात आजची ट्रीप सुरू होण्यापूर्वीच देत आहे. फक्त प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबर येथील जीवन प्रणालीची ओळख करून देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.

ऑस्ट्रेलियात शेती, वनीकरण आणि मासेमारी हे तिन्ही महत्वपूर्ण घटक असून एकूणच आर्थिक उलाढालीत तिचा प्रभाव आपणांस चांगलाच दिसून येतो.येथील स्थानिक वनस्पती आणि वन्यजीव यांचे फार मोठे अस्तित्व येथील घनदाट सदाहरित जंगलातून आपणांस समजून येऊ शकतो.
गवताळ भागात गुरांच्या सुधारित जाती निर्माण करून दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी करण्यात येत आहे. तसेच पाळीव प्राण्यांचा अन्नाच्या व्यापारासाठी उत्तेजन मिळत आहे.
येथील शेतकऱ्यांची किमान शंभर ते हजारो एकर स्वतःच्या मालकीची जमीन असते. या विस्तीर्ण जागेत त्याचा स्वतःचा टुमदार बंगला, गॅरेज, गेस्टहाऊस असते.या जागेत ते पशुपालन जर्सीगायी, मेंढ्यापालन शेकड्याने करीत असतात. बारमाही पाऊस, त्यामुळे विपुल हिरवागार चारा उपलब्ध असतो. येथे गुरांसाठी अथवा मेंढ्यापालनकरीता गोठ्याची आवश्यकता नसते. हे पशुधन मनसोक्त कुराणात चरतात. तिथेच पाणी पिण्याची छोटे छोटे तलाव खोदून ठेवलेले असतात.

ही ठराविक जागा सतत बदलतात. येथल्या मेढ्या॔ची लोकर अत्यंत उच्च प्रतीची असते. यातूनच फार मोठे उत्पन्न मिळते.तीच पशुसंवर्धनातून भरघोस उत्पन्न मिळते. दूध उत्पन्ना बरोबर पशुविक्रीतून चांगलाच फायदा होतो. यासर्वाचे नियंत्रण फक्त दोन शिकवण दिलेले प्रशिक्षित कुत्रे करतात. म्हणून येथील शेतकरी सुखी,समधानी आणि श्रीमंत आहे.
ऑस्ट्रेलियाची राज्यघटना ज्याला आपण संवैधानिक स्वरूपाचे मिश्रण म्हणून क्रूड मानता येईल. येथे 1 January 1901 ला ब्रिटिश राजेसह एक घटनात्मक राजेशाही स्थापन करण्यात आली. ज्याचे स्थानिक पातळीवर गव्हर्नर जनरल, ऑस्ट्रेलियातील राज्य करणारे सार्वभौम प्रतिनिधी, त्याच प्रमाणे काॅमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया संसदेच्या सदस्यानी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन राज्याच्या सरकारसह ब्रिटिश माॅडेलचा सर्वानुमते स्विकार करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या उच्च न्यायालयार्फत घटनात्मक विवादाचे निराकरण करण्यात येत असते.
येथे हे स्पष्ट करायला पाहिजे कि, ब्रिटिश साम्राज्याचा प्रमुख हा ऑस्ट्रेलियाचाही. औपचारिक राजा असतो. गव्हर्नर- जनरल, राज्यपाल यांची नियुक्तीही राजाकडून औपचारिकरित्या होते. सार्वजनिक निवडणूकीत बहुमत प्राप्त केल्यानंतर त्या नेत्याची पंतप्रधान म्हणून घोषणा होते. ऑस्ट्रेलियातील विधानसभाही द्विसदनीय असून द हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह कनिष्ठ सभागृह आणि यांची संख्या 150 असते. तर दोन सिनेट मध्ये 76 सदस्य असतात. यांचा कालावधी तीन वर्षाचा असतो. एक सदस्य अनेक वेळा निवडणूक लढवू शकतो.
ऑस्ट्रेलिया खंडाच्या विस्तीर्ण भूभागावर आज फक्त अंदाजे 27,307,000 लोकसंख्या असून इतर देशाच्या तुलनेत खूपच अत्यंत विरल आहे. भरपूर प्रमाणात जमीन येथे उपलब्ध आहे. नैसर्गिक खनिज संपत्तीही प्रचंड आहे.
चलन विनिमय दर हा 1 USD म्हणजेच 1.545 ऑस्ट्रेलियन डाॅलर इतका आहे.
राज्य प्रमुख म्हणून ब्रिटिश सम्राट किंग चार्ल्स तिसरे हे आहेत. ऑस्ट्रेलियातील जनजीवन आरामदायी असेच असून ते खूप मेहनती आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारचे नेतृत्व आता अँथनी अल्बानीज या लोकप्रिय प्रामिसिंग नेत्याच्या हाती सोपविण्यात आली आहे. आणि अल्पावधीतीच आपली छाप ऑस्ट्रेलियन जनतेसमोर पाडण्यात चांगलेच यश मिळविले आहे अशी येथील काही स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर समजून आले.
ऑस्ट्रेलियन कायदेशीर व्यवस्था ही इंग्लंड मधील सर्व साधारण कायद्या प्रमाणेच आधारित आहेत. कायद्याचे प्रशासन हे राज्याच्या हातात असते. काही वादविवाद निर्माण झाल्यास सर्वोच्च न्यायालयात त्याचे निराकरण केले जाते. ही सर्व राज्य शकट चालविणारी प्रणाली मला आमच्या गाईडनी फावल्या वेळात जेव्हा त्याला काही माहिती किंवा उद्घोषना करावयाची नव्हती तेव्हा गप्पाच्या ओघात दिली होती.
ऑस्ट्रेलियाची लष्करी परंपरा मजबूत स्वरूपाची आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि मानवतावादी प्रयत्नात महत्वपूर्ण भूमीका बजावली आहे. येथे ऑस्ट्रेलियन नागरिकांना लष्करी सेवा सक्तीची नसून ती ऐच्छिक आहे. मात्र आधुनिक शस्त्रे,अस्त्रे या ह्यष्टीकोनातून ते सामर्थ्यवान आहेत.

आज आम्ही ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराला भेट देणार आहोत त्यासाठी विमानाने प्रवास करायचा होता. आम्ही विंचवाचे बिऱ्हाड जसे पाठीवर असते त्याप्रमाणेच आमच्या बॅगा सांभाळीत एका हाॅटेल मधून दुसर्या हाॅटेलात स्थलांतर करीत आहोत. युरोपच्या ट्रीप मध्ये काय कि अन्य देशातील ट्रीप मध्ये असाच अनुभव वारंवार आला होता. यात तक्रार करण्यासारखे काहीच नव्हते. हा संवयीचा एक भाग झाला होता त्यामुळे तक्रारीचा प्रश्नच नव्हता.
आम्हाला घेऊन जाणारा प्रवासी कोच मेलबर्न विमानतळावर पोचल्यावर नेहमीच्याच औपचारिक फाॅरमालिटीज पुर्ण करुन आमचे विमान कॅनबेरा विमानतळाच्या दिशेने झेपावले आणि कॅनबेरा विमानतळावर लॅड झालेही. आता आमचा मुक्काम सिडनीत होता. येथे आल्यावर वातावरणातील बदल जाणवत होता. प्रथम हाॅटेल मध्ये इन करण्याचे सोपस्कार अमंल सवयीनुसार पार पाडले. ग्रुप लिडरने नवे ठिकाण म्हणून पुन्हा नव्याने तितक्याच उत्साहाने सुचना दिल्या. आम्हीही सवयीनुसार ऐकून घेतल्या.
ऑस्ट्रेलियाची ही कॅनबेरा राजधानी ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ह्यष्टीकोनातून अतिशय संपन्न आहे. तेथे अनेक वस्तु आणि वास्तु माॅन्युमेंट त्याची साक्ष देतात. आम्हाला माऊंट अॅनसिले येथूनच शहराचा परफेक्ट नजारा दाखविण्यात आला. हा अनुभवही अविस्मरणीय असाच होता.
पुढील भेट ही ऑस्ट्रेलियाची नॅशनल युनिव्हर्सिटीची होती. या विद्यापीठाची भव्यता, दिमाखदार आकर्षक व्हिक्टरोरियन कालीन शैलीतील बांधकाम, विस्तीर्ण पटांगणे, ज्ञानदान करणारी समृद्ध ग्रथांलये सारे कसे सस्मित करणारे होते. अलीकडे ऑस्ट्रेलियात शिक्षणानिमीत्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. त्यात भारतीय विद्यार्थ्यी संख्या लक्षणीय अशीच आहे. शैक्षणिक पोषक वातावरण, सुविधा, स्काॅलरशिप इत्यादी आकर्षित करणार्यां अनेक फॅक्टर कारणीभूत आहेत.

मी लाँग ड्राईव्ह चालू असतानाच आमच्या गाईडशी ऑस्ट्रेलियातील शिक्षण पध्दतीची माहिती घेतली. (तेव्हढीच ज्ञानात भर, केल्याने पर्यटन हा सुविचार आठवला होता.) मग त्यांनीही उत्साहाने माहिती देण्यास सुरूवात केली. बालपणीचे शिक्षण प्री स्कूल, त्यानंतर प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक उच्च शाळा, आणि शेवटी तृतीय स्तरावरील म्हणजेच विद्यापीठ व इतर उच्च शिक्षणाचा समावेश असतो. व्यावसायिक शिक्षण हे नोंदणीकृत संस्थेमधून घेता येते.
ऑस्ट्रेलियन शिक्षणाच्या गुणवत्तेच्या स्तराचा जागतिक पातळीवर तुलनात्मक परीक्षण केल्यास पहिल्या शंभर मध्ये स्थान मिळवतात हे त्यांनी अभिमानाने सांगितले. येथील शैक्षणिक सोयी सुविधांचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन करण्यास भाषा कार्यक्रम, करिअर सेवा आणि समुपदेशन सेवा उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून योग्य ती माहिती देण्यात येत असते. त्यात निरनिराळ्या स्काॅलरशिप विषयक माहितीचाही समावेश असतो.
ऑस्ट्रेलियात शिक्षणानिमीत्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जे अभियांत्रिकीत, डाॅक्टर, आयटी, व अन्य व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑस्ट्रेलियन एज्युकेशन आणि व्हिसा सर्वीसेस मार्फत मदत केली जाते. येथे ऑस्ट्रेलियन विद्यापीठात मूल्यांकन करण्याच्या विविध पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यात असाईनमेन्ट, गट गुप्र चर्चा, सादरीकरण इत्यादीचा समावेश असतो. यामध्ये भारतातून शिक्षणानिमीत्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे हे सुध्दा त्यांनी आवर्जून सांगितले.
या विद्यापीठाच्या भेटीनंतर लेक बर्ली ग्रिफीनचे आता नामांतर वाॅल्टर बर्ली ग्रिफीन या प्रख्यात वास्तुविशारद यांच्या नावांने करण्यात आले आहे. यानीच कॅनबेरा सिटीचे डिझाईन केले आहे. येथील नवीन संसद भवनाची निर्मीती ही युनिक असून वास्तुशास्त्राचा एक अप्रतिम मास्टरपिस आहे.

ही आयकॉनिक इमारत थेट आपल्याशी संवाद करते असाच भास होत असतो. तद्नंतर हाय कॅपिटल हिलवरील बिल्डिंग , ऑस्ट्रेलियाची राॅयल मिंट, आणि राष्ट्रीय सांस्कृतिक आकर्षण असलेली हेरिटेज साईट पाहून आमचे आजची आयटनरी संपली होती.

मग अखेरचे सत्र डिनर साठी भारतीय रेस्टॉरंट मध्ये प्रस्थान. तेथे काहीचा श्रमपरिहाराचा झटपट कार्यक्रम. साग्रसंगीत भोजन आणि शेवटी थकल्या भागल्या शरीराला विश्रांतीसाठी हाॅटेल कडे प्रस्थान केले. आज नियमित शेड्युल पेक्षा थोडा उशीरच झाला होता. पण हाॅटेल उद्याही तेच असणार होते.










