
मुंबई : राज्यातील पूर परिस्थितीमुळे राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंड्या रद्द केल्या. तरी गोविंदा पथकांचा उत्साह मात्र कायम असल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईत दादर येथील सुप्रसिद्ध जिवादेवाशी निवास मंडळाची दहीहंडी साईराम मित्र मंडळाने आठ थरांचा मानवी मनोरा रचून फोडली. दुपारी १२ च्या सुमारास ही दहीहंडी फुटली. ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाने संस्कृती युवा प्रतिष्ठान येथे ९ थरांची सलामी दिली. तर मुंबई उपनगरातील विघ्नहर्ता गोविंदा पथकाने चेंबूर येथे ८ थरांचा मानवी मनोरा रचून मिळालेल्या ५० हजारांच्या पारितोषिकातील ४० हजार रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाहीर केले.






