
रताळे पोळी
साहित्य:
• २ कप रताळ्याच्या फोडी
• १ कप किसलेला गूळ
• कणिक
• २ टेस्पून तेल
• तूप
कृती:
• फोडी कूकरमध्ये वाफवून घ्याव्यात. फोडी कूकरच्या डब्यात ठेवाव्यात, डब्यात पाणी घालू नये. डब्यावर झाकण ठेवावे व फक्त कूकरच्या तळाशी पाणी घालावे. आणि २-३ शिट्ट्या कराव्यात.
• गरम फोडींमध्ये गूळ घालून चमच्याने ढवळावे. मिश्रण पातळसर झाले कि भिजेल इतकी कणिक त्यात घालावी व तेल लावून मळावे. मध्यम भिजवावे. पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.
• पोळ्या लाटून तूपावर खरपूस भाजून घ्याव्यात.
• या पोळ्या ३-४ दिवस छान टिकतात.
टीप:
• पोळ्या जर जास्त गोड हव्या असतील तर १ कप ऐवजी सव्वा कप गूळ वापरावा.











