
साहित्य
• छोटी वांगी पाव किलो
• तूर डाळ एक वाटी
• टोमाटो एक , सुक्या लाल मिरच्या चार-पाच ,
• गरम मसाला दोन चमचे
• कोथिबीर , तेल पाव वाटी
• फोडणीचं साहित्य , मीठ .
कृती:
• वांगी धुवून मसाला वांगी करतो त्याप्रमाणे देठासकट ठेवून त्याच्या गोलाकार भागावर + असा छेद घ्यावा.
• तुरीची डाळ अर्धा तास आधी भिजवून ठेवावी व निथळून घ्यावी . भांड्यात तेल गरम करून मेथीची फोडणी करावी .
• त्यात तुरीची डाळ घालावी. डाळ चांगली परतल्यावर त्यात गरम मसाला व टोमाटोच्या बारीक फोडी घालाव्यात. चवीपुरतं मीठ घालावं .
• तुरीची डाळ अर्धवट शिजल्यावर त्यात वांगी घालावी . डाळ अशा पद्धतीनं शिजू द्यावी की डाळीचा दाणा सुटा राहील आणि वरण घट्टसर होणार नाही .
• डाळींब्या वरण म्हणतात त्याप्रमाणे डाळ असली पाहिजे . वांगी डाळीच्या स्वादानं वाफेवर शिजतात .
• डाळ वांगं शिजल्यावर ते वाढण्याआधी त्यावर सुक्या लाल मिरच्यांचा तडका घालावा व कोथिंबीर पेरावी .











