मनसेचे नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नितीन नांदगावकर यांनी त्यांचा कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे एन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बाजू या विभागात भक्कम झाली आहे.