
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आज लंडन ऑलिम्पिक (London Olympics) खेळातील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढला. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने (Team India) सर्वात चांगली कामगिरी करत 6 पदके जिंकली होती. त्यानंतर आता 2021 मध्ये टोकियोमध्ये भारताने एक सुवर्ण पदाकासह एकूण सात पदके जिंकत, लंडन ऑलिम्पिक पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. खेळाच्या 15 व्या भारतासाठी बजरंग पुनियाने कांस्य तर भालाफेकीपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ऐतिहासिक सुवर्ण पदकाची कमाई केली. टोकियो खेळात भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा 127 खेळाडूंचा दल पाठवला होता. यापैकी अनेकांनी विशेषतः महिला खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रत्येकाच्या मनावर ठसा उमटवला. 2021 लंडन ऑलिम्पिक खेळात टीम इंडियाने 2 रौप्य व 4 कांस्य पादकांसह एकूण सहा पदके जिंकली होती तर यंदाच्या टोकियो खेळात एकूण सात पदके खिशात घातली आहेत.
भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी बजावत टोकियो ऑलिम्पिक खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. यासह नीरजने ऑलिम्पिक पोडियममध्ये भारताचा तिरंगा फडकावला आणि टोकियो खेळात भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गुंजले.











